गुहागर, ता. 20 : तालुक्यातील धोपावे सावंतवाडी कुंभाराचा आंबा ते सावंतवाडी रस्त्याचे खडीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक १६/०१/२०२५ रोजी मा.आमदार भास्करराव जाधव यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. Bhoomipujan of road at Dhopave


सदर रस्त्याचे काम हे आमदार साहेबांच्या प्रयत्नाने जन सुविधा अंतर्गत मंजूर झाले असून कार्यक्रम करिता शिवसेना उ.भा.ठा. गटाचे वरिष्ठ कार्यकर्ते विनायक मुळे तसेच सदर रस्त्यासाठी जमीन विनामुल्य दिली असे जमीन मालक विलास निमकर. सरपंच आशीर्वाद पावसकर, उपसरपंच संदीप पवार, ग्रामपंचायत अधिकारी वारे मॅडम तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सावंतवाडी नवतरुण विकास मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत व कार्यकर्ते आणि महिला मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थितांचे सावंतवाडी ग्रामस्थांकडुन पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. Bhoomipujan of road at Dhopave

