गुहागर, ता. 25 : गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा व संबंधित योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमअंतर्गत आज दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर येथे संकल्प यात्रेचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. Bharat Sankalp Yatra in Guhagar


विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे. Bharat Sankalp Yatra in Guhagar