पालशेत, अडूर परिसरातून 500 लिटरची चोरी तरीही तक्रार नाही
गुहागर, ता. 22 : गुहागर तालुक्यात पेट्रोल चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या 7 दिवसात पालशेत, हेदवी, अडूर या परिसरातून या टोळीने सुमारे 500 लिटरची पेट्रोल चोरी केली आहे. ही टोळी वाहनांचे नुकसान करुन पेट्रोल चोरत असल्याने ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान अनेक वाहन मालकांच्या गाड्यांचे नुकसान झाले असले तरी एकाही व्यक्तीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. Petrol stealing gang active in Guhagar
गुहागर तालुका महामार्ग, रेल्वेमार्गापासून दूर असल्याने येथे चोऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामस्थ रस्त्यावर, अंगणात, खुल्या जागेत बिनधास्त आपली वाहने रात्री उभी करतात. काहीवेळा वाहनांच्या किल्ल्याही काढल्या जात नाहीत. मात्र गेल्या 7 दिवसात तालुक्यातील विविध ठिकाणाहून पेट्रोल चोरीच्या बातम्या येऊ लागल्या. यामध्ये पालशेत, अडूर, हेदवी परिसरातील पेट्रोल चोरीच्या घटना जास्त आहेत. पेट्रोल चोरणारे टोळके सहजगत्या पेट्रोल मिळाले नाही तर वाहनांचे नुकसान करुन पेट्रोल पळवतात. पालशेतमध्ये एका जीपचा पाईप कापून डिझेल चोरीला गेले. एका कारची टाकीच पेट्रोल चोरांनी तळातून कापली आणि पेट्रोल पळवले. सध्या पालशेतमध्ये शुटींग सुरु आहे. त्यामध्ये व्यस्त असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या पेट्रोलचा कॉक तोडून 11 लिटर पेट्रोल चोरले गेले. पेट्रोल चोरांच्या अशा कृत्यामुळे वाहन मालकांचे दुहेरी नुकसान होत आहे. एका वाहन मालकाला रात्री अचानक डॉक्टरांकडे रुग्ण घेवून जाण्याची वेळ आली. मात्र त्याच्या गाडीचा पेट्रोल पाईप कापलेला असल्याने अपरात्री अन्य दोस्तांना उठवून त्याला रुग्णांसाठी गाडीची तजवीज करावी लागली. Petrol stealing gang active in Guhagar
पेट्रोल चोरीच्या घटनांना आता तोंड फुटले आहे. सुरवातीला आपल्याच गाडीतील पेट्रोल गेले असेल असे समजुन ग्रामस्थ गप्प होते. मात्र आता गावगप्पांमधुन विविध ठिकाणी होणाऱ्या पेट्रोलचोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. यदाकदाचित रंगेहाथ एखादा पकडला गेला तर त्याच्यावर सपाटून मार खाण्याइतके वातावरण तापले आहे. मात्र या सर्व घटनांनंतर कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही. Petrol stealing gang active in Guhagar
पालशेतमधील श्रीकांत फणसे यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. पेट्रोल चोरीमुळे नुकसान झालेल्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तर वेगवेगळ्या घटनांमधील पेट्रोल चोरांची कार्यपध्दती समोर येइल. चौकशीतून चोर गावातले की बाहेरचे आहेत अशी माहिती मिळू शकते. त्यामुळे जास्तीतजास्त जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक सावंत यांनी केले आहे. Petrol stealing gang active in Guhagar