गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानच्यावतीने सुरू झालेल्या महाशिवरात्री उत्सवांतर्गत 2 मार्च रोजी दुपारी 3 वाजता राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील तमाम भजन रसिक व भजन प्रेमींना हा संगीत भजनाच्या मैफलीचा महामेळा पाहण्यासाठी व ऐकण्याची संधी सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वरच्या वतीने आयोजित केली आहे. Bhajan competition at Velneshwar


या स्पर्धेमध्ये कणकवली येथील श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ (अमेय आरडेकर बुवा), वैभववाडी येथील दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ (विकास नर), डोंबिवलीचा विष्णू स्मृती भजन सेवा संघ (नागेश सावंत), वेंगुर्लेतील तुळस वडखोलचे मूळ पुरुष प्रासादिक भजन मंडळ (पुरुषोत्तम परब), कुडाळचे नादब्रह्म भजन मंडळ – (सुंदर मिस्त्री), विक्रोळीचे श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (राजाराम परब), संगमेश्वरचे श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ (अभय नांदलसकर), मळणचे भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ (अनंत नाटुस्कर), अलिबाग-रायगडचे नादब्रह्म भजन मंडळ (चेतन पाटील), रायगड येथील सोमजादेवी प्रासादिक भजन मंडळ (भावेश शीतकर) अशा राज्यभरातून दहा निमंत्रित भजन मंडळांना बोलावण्यात आले. Bhajan competition at Velneshwar
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास रोख 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख 20 हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकास रोख 15 हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेतील वैयक्तिक उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट कोरस यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. Bhajan competition at Velneshwar