रत्नागिरी, ता. 10 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊनने दिनांक 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन शिवाजी स्टेडियम ,रत्नागिरी येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केले आहे. Badminton Tournament in Ratnagiri
सिंगल्स, डबल्स आणि लकी डबल्स अशा विविध वर्गांमध्ये या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना भाग घेता येईल. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांनी www.mbasso.in या संकेतस्थळाला भेट देऊन दिनांक 11 डिसेंबर पूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सिंगल्स, डबल्स साठी रू. 800/- तर लकी डबल्ससाठी रू. 1000/- नोंदणी शुल्क आहे. Badminton Tournament in Ratnagiri
या रत्नागिरी बॅडमिंटन सब ज्युनिअर अँड ज्युनिअर चॅम्पियनशिप मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे प्रेसिडेंट रोटे. हिराकांत साळवी आणि सेक्रेटरी रोटे. डॉ. संदीप करे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रोटे.बिपिनचंद्र गांधी 9403507507, रोटे.निलेश मलुष्टे 9422430044 या रोटेरियनशी संपर्क करावा. Badminton Tournament in Ratnagiri