गुहागर, ता. 13 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे फाटा ते पालपेणे कुंभारवाडी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु वर्षभरामध्ये या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. शृंगारतळी पालपेणे फाट्यापासून पुढे पालपेणे कुंभारवाडीपर्यंत रस्त्यावरून वाहने चालवणे वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. Bad condition of Palpene road
पालपेणे नळपाणी योजनेची पाईपलाईन सुद्धा दोन ठिकाणी या रस्त्याखालून टाकण्यात आली आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर कुठल्याही प्रकारची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आली नाही. पाईपलाईन टाकल्यानंतर संबंधित ठेकेदाराने खोदलेला रस्ता बुजविला नसल्याने सतत वाहतूक व पावसामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. दाभोळ ब्रेक वॉटरचे काम करण्यासाठी लागणार्या काळ्या दगडाच्या जड वाहतूकीचे डंपर देखील याच मार्गावरून जात असतात. पावसाळ्यापूर्वी जड वाहतुकीचे शेकडो डंपर याच रस्त्यावरून जात असल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांतून होत आहे. Bad condition of Palpene road