गुहागर शहर शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी
गुहागर, ता. 26 : गुहागर शहरातून वेलदूरकडे जाणाऱ्या वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची खडी आणि दगड वर आले आहेत. यामुळे अपघाताचे प्रसंग घडत आहेत. तसेच वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. गेली अनेक दिवसांपासून शहरातील चर्चा सुरु आहे. अखेर गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर आणि शहर प्रमुख निलेश मोरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन या रस्त्याची माहिती देऊन गणपतीपुर्वी पडलेले खड्डे आणि त्यानंतर या मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. Bad condition of Guhagar Varchapat road
गुहागर बाजारपेठ पासून सुरू होणारा गुहागर – वेलदुर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते. परंतु, मलमपट्टी प्रमाणे काही दिवसातच खड्डे पुन्हा दिसू लागले. या भागात दुचाकीस्वरांचे अनेक अपघात झालेले आहेत. त्यामध्ये एक मयत तर काही जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचविताना एकाच बाजूने मार्गक्रमण करताना वाहन चालकांची विशेषत: टुव्हीलर चालकांची तारांबळ होऊन रिक्षांना मागून ठोकून अपघात झाले आहेत. काही वेळा तर या अपघातांमुळे चालक यांच्यामध्ये हाणामारी किंवा वादावादीचे प्रसंग घडतात. Bad condition of Guhagar Varchapat road
गुहागर शहरात प्रामुख्याने रिक्षा व्यवसाय हा जास्त प्रमाणत गुहागर – वरचापाट – बाग आरेगाव असा असल्याने रिक्षा व्यवसाय करणे या रस्त्यामुळे अवघड झाले आहे. रिक्षांचे दुरुस्ती करणे हे रोजचे खर्चिक झाले आहे. या मार्गांवरून प्रवास करणे डोकेदुखी ठरत आहे. याची सर्व कल्पना शहरप्रमुख निलेश मोरे यांनी पालकमंत्र्यांना दिली. याबाबत आपण लक्ष घालू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख संदीप भोसले उपास्थित होते. Bad condition of Guhagar Varchapat road