• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर वरचापाट रस्त्याची दुरावस्था

by Guhagar News
August 26, 2024
in Guhagar
366 4
2
Bad condition of Guhagar Varchapat road

वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याच्या झालेल्या दुरावास्थेबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर व शहर प्रमुख निलेश मोरे

719
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर शहर शिवसेनेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

गुहागर, ता. 26 : गुहागर शहरातून वेलदूरकडे जाणाऱ्या वरचापाट आरे पुलापर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून रस्त्याची खडी आणि दगड वर आले आहेत. यामुळे अपघाताचे प्रसंग घडत आहेत. तसेच वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. गेली अनेक दिवसांपासून शहरातील चर्चा सुरु आहे. अखेर गुहागर शहर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर आणि शहर प्रमुख निलेश मोरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन या रस्त्याची माहिती देऊन गणपतीपुर्वी पडलेले खड्डे आणि त्यानंतर या मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. Bad condition of Guhagar Varchapat road

गुहागर बाजारपेठ पासून सुरू होणारा गुहागर – वेलदुर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी पडलेले खड्डे बुजवण्यात आले होते. परंतु, मलमपट्टी प्रमाणे काही दिवसातच खड्डे पुन्हा दिसू लागले. या भागात दुचाकीस्वरांचे अनेक अपघात झालेले आहेत. त्यामध्ये एक मयत तर काही जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचविताना एकाच बाजूने मार्गक्रमण करताना वाहन चालकांची विशेषत: टुव्हीलर चालकांची तारांबळ होऊन रिक्षांना मागून ठोकून अपघात झाले आहेत. काही वेळा तर या अपघातांमुळे चालक यांच्यामध्ये हाणामारी किंवा वादावादीचे प्रसंग घडतात. Bad condition of Guhagar Varchapat road

गुहागर शहरात प्रामुख्याने  रिक्षा व्यवसाय हा जास्त प्रमाणत गुहागर – वरचापाट – बाग आरेगाव असा असल्याने रिक्षा व्यवसाय करणे या रस्त्यामुळे अवघड झाले आहे. रिक्षांचे दुरुस्ती करणे हे रोजचे खर्चिक झाले आहे. या मार्गांवरून प्रवास करणे डोकेदुखी  ठरत आहे. याची सर्व कल्पना शहरप्रमुख निलेश मोरे यांनी पालकमंत्र्यांना दिली. याबाबत आपण लक्ष घालू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख संदीप भोसले उपास्थित होते. Bad condition of Guhagar Varchapat road

Tags: Bad condition of Guhagar Varchapat roadGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share288SendTweet180
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.