जेष्ठ व दिव्यांगांच्या घरी निवडणूक आयोग
गुहागर, ता. 15: गुहागर मतदार संघामध्ये गुरुवार दि. 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदानाला सुरूवात करण्यात आली आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व पात्र दिव्यांग मतदारांसाठी दि 14/11/2024 पासून हे गृह मतदान ( Home Voting ) सुरु करण्यात आले आहे. यासाठी गुहागर तालुक्यात 13 पथके, चिपळूण तालुक्यात 10 पथके व खेड तालुक्यात 10 अशी एकूण ३३ पथके तयार करण्यात आली आहेत. Assembly polling begins


गुहागर मतदारसंघामध्ये एकूण 768 वयोवृद्ध व 136 दिव्यांग अशा एकूण 904 मतदारांचे गृह मतदानाद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. दि. 14/11/2024 रोजी 327 मतदारांचे मतदान पूर्ण झाले असून दि 17/11/2024 पर्यंत गृह मतदानाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. Assembly polling begins