ग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री मासू कातळवाडी येथे येण्यासाठी खासगी प्रवासी वाहनाने निघाले. शुक्रवारी (ता. 13 ऑक्टोबर) सकाळी मासू निवळकरणी थांबा येथे गाडीतून उतरले. परंतू तेथून ते घरी पोहोचले नाहीत. तेव्हापासून मासुतील ग्रामस्थ अशोक भोजने यांचा शोध घेत आहेत. Ashok Bhojane from Masu is missing


अशोक भोजने हे नवरात्रीमध्ये मुळ घरात घट बसविण्यासाठी मुंबईहून मासु (ता. गुहागर) येथे येण्यासाठी निघाले होते. मासु, आवरे, असोरे हा परिसर विरळ लोकवस्तीचा असून येथील वाड्या मुख्य रस्त्यापासून 1 ते 2 कि.मी. दूर आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत एकट्या प्रवाशाला मुख्य रस्त्यापासून घरापर्यंत जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत असल्याने चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अशोक भोजने यांच्या बेपत्ता होण्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. शुक्रवार पासून रविवारपर्यंतच्या कालावधीत ग्रामस्थांनी येथील जंगल परिसर, नदी किनारे येथे शोध घेतला. परंतु अशोक भोजने सापडलेले नाहीत. Ashok Bhojane from Masu is missing


अशोक सिताराम भोजने बेपत्ता झालेल्याची रितसर तक्रार गुहागर पोलीस ठाणे यांचेकडे मासूचे सरपंच प्रकाश भोजने यांनी व त्यांच्या मुलाने केली आहे. आजही त्यांचा शोध ग्रामस्थ आणि पोलिस घेत आहेत. अशोक भोजने कुठेही दिसल्यास, सापडल्यास त्वरीत मासू गावचे सरपंच प्रकाश भोजने मो.नं.८२७५६५६३११, आशिष भोजने मो.नं.८६९२९४७२७९, राकेश भोजने मो.नं.९८२११७६४११, सचिन भोजने, गुहागर पोलीस ठाणे यांना कळवावे. असे आवाहन मासुच्या ग्रामस्थांनी केले आहे. Ashok Bhojane from Masu is missing