• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 May 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मासू येथील अशोक भोजने बेपत्ता

by Mayuresh Patnakar
October 18, 2023
in Guhagar
242 3
0
Ashok Bhojane from Masu is missing

अशोक भोजने

476
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामस्थांचा शोध सुरु, घट बसविण्यासाठी घरी येत होते

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील मासू कातळवाडी येथील ग्रामस्थ अशोक सिताराम भोजने  (वय ५३ ) बेपत्ता झाले आहेत. ते मुंबईहुन गुरुवारी (ता. 12) रात्री  मासू कातळवाडी येथे येण्यासाठी खासगी प्रवासी वाहनाने निघाले. शुक्रवारी (ता. 13 ऑक्टोबर) सकाळी मासू निवळकरणी थांबा येथे गाडीतून उतरले. परंतू तेथून ते घरी पोहोचले नाहीत. तेव्हापासून मासुतील ग्रामस्थ अशोक भोजने यांचा शोध घेत आहेत. Ashok Bhojane from Masu is missing

अशोक भोजने हे नवरात्रीमध्ये मुळ घरात घट बसविण्यासाठी मुंबईहून मासु (ता. गुहागर) येथे येण्यासाठी निघाले होते. मासु, आवरे, असोरे हा परिसर विरळ लोकवस्तीचा असून येथील वाड्या मुख्य रस्त्यापासून 1 ते 2 कि.मी. दूर आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत एकट्या प्रवाशाला मुख्य रस्त्यापासून घरापर्यंत जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत असल्याने चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अशोक भोजने यांच्या बेपत्ता होण्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. शुक्रवार पासून रविवारपर्यंतच्या कालावधीत ग्रामस्थांनी येथील जंगल परिसर, नदी किनारे येथे शोध घेतला. परंतु अशोक भोजने सापडलेले नाहीत. Ashok Bhojane from Masu is missing

अशोक सिताराम भोजने बेपत्ता झालेल्याची रितसर तक्रार गुहागर पोलीस ठाणे यांचेकडे मासूचे सरपंच प्रकाश भोजने यांनी व त्यांच्या मुलाने केली आहे.  आजही त्यांचा शोध  ग्रामस्थ आणि पोलिस घेत आहेत. अशोक भोजने कुठेही दिसल्यास, सापडल्यास त्वरीत मासू  गावचे सरपंच प्रकाश भोजने  मो.नं.८२७५६५६३११, आशिष भोजने मो.नं.८६९२९४७२७९, राकेश भोजने मो.नं.९८२११७६४११, सचिन भोजने, गुहागर पोलीस ठाणे यांना कळवावे. असे आवाहन मासुच्या ग्रामस्थांनी केले आहे. Ashok Bhojane from Masu is missing

Tags: Ashok Bhojane from Masu is missingGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share190SendTweet119
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.