गुहागर, ता. 15 : तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथे दि. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ द्यावा. Ashadhi Ekadashi festival at Chikhli
या कार्यक्रमात दि. 17 जुलै रोजी सकाळी 08 वाजता अभिषेक, पुजा, आरती व प्रसाद वाटप, सकाळी 11 वाजता मराठी शाळा विद्यार्थी यांचे गुरुजनासोबत दिंडीचे मंदिरात आगमन, गुरुजन व इतर सहकारी वर्गाचे स्वागत, 10 वी, 12 वी व उच्चशिक्षित मुलांचा सत्कार तसेच मुलांना वह्यांचे व खाऊचे वाटप, सायंकाळी 6 ते 7 परिपाठ, रात्रौ 7 ते 9 ह.भ.प. राजेद्र महाराज राजेशिर्के सावर्डे कुडप यांचे किर्तन होईल. तसेच सचिन गजानन हेगशेटे, प्रथमोपचार केंद्र, चिखली यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ द्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे. Ashadhi Ekadashi festival at Chikhli