गुहागर, ता. 03 : येथील खरे-ढेरे –भोसले महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य पद्मनाभ सरपोतदार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आनंद कांबळे, इतिहास विभागप्रमुख सौ.रश्मी आडेकर उपस्थित होते. Anti-Drug Abuse Day in KDB College
जागतिक पातळीवर १९८९ पासून अखिल मानव जातीमध्ये जागृती करून सर्व प्रकारच्या मादक द्रव्याच्या सेवनापासून दूर राहणे व निरोगी जीवन जगणे हा उदात्त हेतू आहे. सौ.रश्मी आडेकर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आढावा घेतला. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात असलेली दर्जा व संधीची समानता सामाजिक, आर्थिक न्याय आदी उद्दिष्टांची अंमलबजावणी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच सुरुवात केल्याचे स्पष्ट केले. Anti-Drug Abuse Day in KDB College
यावेळी विद्यार्थ्यांना शासनाच्या वेबसाईटवरून मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी शपथ देण्यात आली व ऑनलाईन माहिती भरून प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. प्रमोद आगळे यांनी आजची युवा पिढीला व्यसना पासून अलिप्त राहताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या मादक द्रव्यांमुळे व्यसनाधीन होण्याची कारणे, परिणाम आणि उपाय यावर विद्यार्थ्यांना उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. प्राचार्य पद्मनाभ सरपोतदार यांनी डॉ. अनिल अवचटांच्या मुक्तांगण या संस्थेच्या कार्याची माहिती देऊन त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. शेवटी प्रा. डॉ. सोळंके यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. Anti-Drug Abuse Day in KDB College