• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत “आनंद मेळा”

by Ganesh Dhanawade
March 22, 2025
in Guhagar
153 2
0
"Anand Mela" at Ratnagiri Gas and Power Company
301
SHARES
859
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संजना महिला समितीच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित “आनंद मेळा” २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे दोन दिवस करण्यात आले होते. या आनंद मेळा याचे उद्घाटन एनटीपीसी क्षेत्रीय कार्यकारी निदेशक कमलेश सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. “Anand Mela” at Ratnagiri Gas and Power Company

"Anand Mela" at Ratnagiri Gas and Power Company

या आनंद मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे खेळाचे प्रकार, विविध प्रकारचे खाद्यपदार्थचे स्टॉल (खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये स्थानिकांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते.) मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, आपत्कालीन साधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तसेच देशभरातील सर्व राज्यातील प्रमुख गीतांसह महाराष्ट्रातील लोककला तसेच मराठी गीताना प्राधान्य देण्यात आले होते.  विविध स्टॉलची पाहणी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉल वरील विविध पदार्थांचा आस्वाद  प्रमुख अतिथी यांनी घेतला. “Anand Mela” at Ratnagiri Gas and Power Company

या कार्यक्रमाला सखी महिला समिती अध्यक्षा श्रीमती अनु सोनी, आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष तखेले, संजना महिला समिती अध्यक्षा श्रीमती सीमा तखेले, सेक्रेटरी श्रीमती अनुषा राव,आरजीपीपीएल कंपनीचे एचआर एचओडी स्नेहाशिष भट्टाचार्य, अशोक सरकार, कोंकण एलएनजीचे मुख्य लेखा अधिकारी ठाकूर, एचआर विभागाचे एस.पी. रेड्डी, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजीत चटर्जी, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर सोनू शर्मा यांच्यासह आरजीपीपीएलचे सर्व विभाग प्रमुख, संजना महिला समितीच्या सर्व सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संजना महिला समिती, आरजीपीपीएल तसेच कार्यक्रम नियोजन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी श्रीमती अनुषा राव यांनी केले. “Anand Mela” at Ratnagiri Gas and Power Company

Tags: "Anand Mela" at Ratnagiri Gas and Power CompanyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRgpplUpdates of Guhagarआरजीपीपीएलगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीलोकल न्युज
Share120SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.