संजना महिला समितीच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित “आनंद मेळा” २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे दोन दिवस करण्यात आले होते. या आनंद मेळा याचे उद्घाटन एनटीपीसी क्षेत्रीय कार्यकारी निदेशक कमलेश सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. “Anand Mela” at Ratnagiri Gas and Power Company


या आनंद मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे खेळाचे प्रकार, विविध प्रकारचे खाद्यपदार्थचे स्टॉल (खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये स्थानिकांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते.) मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, आपत्कालीन साधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तसेच देशभरातील सर्व राज्यातील प्रमुख गीतांसह महाराष्ट्रातील लोककला तसेच मराठी गीताना प्राधान्य देण्यात आले होते. विविध स्टॉलची पाहणी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉल वरील विविध पदार्थांचा आस्वाद प्रमुख अतिथी यांनी घेतला. “Anand Mela” at Ratnagiri Gas and Power Company


या कार्यक्रमाला सखी महिला समिती अध्यक्षा श्रीमती अनु सोनी, आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष तखेले, संजना महिला समिती अध्यक्षा श्रीमती सीमा तखेले, सेक्रेटरी श्रीमती अनुषा राव,आरजीपीपीएल कंपनीचे एचआर एचओडी स्नेहाशिष भट्टाचार्य, अशोक सरकार, कोंकण एलएनजीचे मुख्य लेखा अधिकारी ठाकूर, एचआर विभागाचे एस.पी. रेड्डी, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजीत चटर्जी, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर सोनू शर्मा यांच्यासह आरजीपीपीएलचे सर्व विभाग प्रमुख, संजना महिला समितीच्या सर्व सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संजना महिला समिती, आरजीपीपीएल तसेच कार्यक्रम नियोजन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी श्रीमती अनुषा राव यांनी केले. “Anand Mela” at Ratnagiri Gas and Power Company