गुहागर, ता. 09 : तालुक्यातील साखरी त्रिशूळ व पालकोट येथील श्री खेम झोलाई, ग्रामदेवता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी आर्थिक निधी संकलनाच्या निमित्ताने कौटुंबिक जीव्हाळ्याचे, शैक्षणिक व हृदयस्पर्शी २ अंकी नाटक लेखक अनिल काकडे, दिग्दर्शक प्रसाद धोपट “कडीपत्ता” सादर करण्यात आले. An innovative initiative of Zolai Mandal Mumbai
हे नाटक रविवार, दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी साहीत्य संघ मंदीर, मुंबई येथे झाले. सदर नाटकाच्या संपूर्ण नियोजनास मुंबई आणि ग्रामीण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. श्री खेम झोलाई मातेचे मंदिर आपल्या कोकणच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे, मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा २००५ साली माजी अध्यक्ष श्री. सोनु म्हसकर, उपाध्यक्ष श्री. वसंत वेद्रे सेक्रेटरी श्री.सखाराम वेद्रे खजिनदार श्री.सुरेश गिजे तसेच मुंबई आणि ग्रामीण कार्यकत्यांच्या उपस्थित संपन्न झाला होता. आत्ता याच मंदिराच्या सुशोभीकरणासाठी चारतुरसीमेच्या प्रत्येक घरातील जास्तीत जास्त मंडळी उपस्थित होती, सर्वांनी अत्यंत सढळ हस्ते या कार्यक्रमासाठी योगदान दिले. सदर कार्यक्रम चतुरसीमा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. अशोक वेद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास माजी अध्यक्ष श्री. सोनु म्हसकर, माजी सेक्रेटरी, श्री. वसंत वेद्रे, उपाध्यक्ष श्री.सुरेश गिजे, सेक्रेटरी श्री. प्रभाकर भोसले तसेच मुंबई आणि ग्रामीणचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. An innovative initiative of Zolai Mandal Mumbai