• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांचे 28 मार्चला आंदोलन

by Ganesh Dhanawade
March 25, 2025
in Ratnagiri
122 1
0
Agitation of contract teachers
240
SHARES
686
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अद्यापही वेतन नाही, उपासमारीची वेळ, सरकारचे दुर्लक्षच

गुहागर, ता. 25 :  जिल्ह्यातील डीएड, बी.एड धारक कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्रस्त झालेले कंत्राटी शिक्षक रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर 28 मार्चला आंदोलन करणार आहेत. तसे पत्र त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा डी.एड, बी.एड कंत्राटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते यांनी ही माहिती दिली. Agitation of contract teachers

जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग या विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 491 शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. 109 शिक्षकांच्या 14 ऑक्टोबर 2024 रोजी नियुक्ती झाली आहे. तर 386 शिक्षकांची 7 जानेवारी 2025 रोजी नियुक्ती झाली. या सर्व शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे या सर्व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 27 मार्च पर्यंत या सर्व शिक्षकाचे वेतन न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलन करणार आहेत. तरी आपण या पत्राची दखल घेऊन आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नये, असे पत्रात नमूद केले आहे. Agitation of contract teachers

Tags: Agitation of contract teachersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.