अद्यापही वेतन नाही, उपासमारीची वेळ, सरकारचे दुर्लक्षच
गुहागर, ता. 25 : जिल्ह्यातील डीएड, बी.एड धारक कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्रस्त झालेले कंत्राटी शिक्षक रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर 28 मार्चला आंदोलन करणार आहेत. तसे पत्र त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा डी.एड, बी.एड कंत्राटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन मोहिते यांनी ही माहिती दिली. Agitation of contract teachers


जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग या विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 491 शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली आहे. 109 शिक्षकांच्या 14 ऑक्टोबर 2024 रोजी नियुक्ती झाली आहे. तर 386 शिक्षकांची 7 जानेवारी 2025 रोजी नियुक्ती झाली. या सर्व शिक्षकांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे या सर्व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 27 मार्च पर्यंत या सर्व शिक्षकाचे वेतन न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलन करणार आहेत. तरी आपण या पत्राची दखल घेऊन आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नये, असे पत्रात नमूद केले आहे. Agitation of contract teachers