• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

18 ते 65 वयोगटासाठी पोस्टाचा अपघाती विमा

by Guhagar News
May 22, 2024
in Ratnagiri
151 1
0
296
SHARES
846
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अवघ्या 755 रुपयांमध्ये पंधरा लाख

रत्नागिरी, ता. 22 : पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार या व्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे ते पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती विभाग डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली. Accident insurance of post

निवाबूपा या नामांकित आरोग्य विमा इन्शुरन्स कंपनीसोबत पोस्ट कार्यालयाने सुरू केली आहे. अपघाती विमा पॉलिसी अपघाती विम्यात पॉलिसी धारकाचा मृत्यू कायमस्वरूपी तात्पुरता किंवा अंशतः अपंगत्वाच्या जोखीमेपासून संरक्षण मिळते. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसाला विम्याची रक्कम मिळते. अपघातातील अपंगत्व किती टक्के आहे, यावर विम्याची रक्कम अवलंबून आहे. या पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे आवश्यक आहे. ग्राहक नुकसानभरपाई व्यतिरिक्त त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये आणि विवाहित मुला-मुलींना एक लाख रुपये दिले जातील. अपघातात पॉलिसीधारकाचे हाड तुटल्यास उपचारासाठी २५ हजार रुपये देण्याची सुविधा आहे. Accident insurance of post

पॉलिसीमध्ये मातृत्वाची सुविधाही देण्यात आली आहे. विमा पॉलिसीमुळे संकट काळात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला किंवा पोस्टमनला भेटून ही पॉलिसी घेऊ शकता. योजनेचा जास्तीस जास्त लाभ घेऊन आपले व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहनही श्री. कुरळपकर यांनी केले आहे. Accident insurance of post

Tags: Accident insurance of postGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share118SendTweet74
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.