• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोली येथील अल्पवयीन युवतीवर अत्याचार

by Guhagar News
January 3, 2025
in Ratnagiri
228 3
0
Abuse of a minor girl
448
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

समाज माध्यमातील ओळखीचा गैरफायदा

दापोली, ता. 03 : समाजमाध्यमांद्वारे झालेल्या ओळखीचा गैरफायदा उठवून दापोली येथील एका अल्पवयीन युवतीवर चिपळूण येथे एका फार्मर्स हाऊसवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित इसमाला अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. Abuse of a minor girl

समाजमाध्यमांवर ओळख झाली तेव्हा अझहर याने वेगळेच नाव सांगितले होते. मात्र या मुलीला त्याचे खरे नाव समजताच तिने त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. याचवेळी अजहर याने लग्न कर असा तगादा लावला मात्र या मुलीने त्यासाठी नकार दिल्याने त्याने या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली अखेर या मुलीने दापोली पोलीस ठाण्यात जावून अझहर विरोधात तक्रार दाखल केली आहे. Abuse of a minor girl

या तक्रारीच्या आधारे संशयित अझहर कडवळकर याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या विविध कलमानुसार (पॉस्को) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सबंधित संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला प्रथम पोलीस कोठडी देण्यात आली व ती संपल्यावर त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत. या मुलीने तक्रारीत संशयिताचे नाव अझहर कडवळकर असे दिले होते मात्र तपासात ते अझहर कडवईकर असे निष्पन्न झाले असल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. Abuse of a minor girl

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूण येथील संशयित अझहर कडवईकर याने समाजमाध्यमांद्वारे मैत्री केली. या मैत्रीमधून तो या मुलीला एप्रिल २०२२ मध्ये चिपळूण येथील एका फार्महाउस वर घेवून गेला व तेथे तिला शीतपेय पिण्यास दिले. ते या मुलीने प्यायले त्यानंतर या मुलीला चक्कर आली व ती बेशुद्ध सदृश्य अवस्थेत गेली. त्याचा फायदा घेवून त्याने या मुलीशी त्याने शरीरसंबध केले व त्याचे फोटोहि काढले. त्यानंतर अझहर याने या मुलीला हे फोटो समाजमाध्यमावर टाकेन अशी धमकी देवून तिला गुहागर व मुरुड येथील लॉजवर नेवून तिच्याशी अतिप्रसंग केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. Abuse of a minor girl

Tags: Abuse of a minor girlGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share179SendTweet112
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.