रत्नागिरी, ता. 30 : जागतिक वारसा सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळ सदस्य व NSS च्या स्वयंसेवकांनी रत्नागिरीतील कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या प्रस्तावित यादीत आपल्या कोकणातील 9 कातळशिल्पांचा अंतर्भाव झाला आहे. कोकणासाठी ही बाब गौरवास्पद आहे. Abhyankar College visited Katalshilp Research Centre
या वेळी संशोधन केंद्रातील सुधीर रिसबुड यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संशोधन केंद्रातील अभ्यासक तार्किक खातू यांनी कातळशिल्पाच्या निर्मितीमागील रहस्ये उलगडून दाखविली. मानवाच्या उत्क्रांती पासून मानवाने वस्तूंची निर्मिती कशी केली याचा मागोवा माहितीत घेतला. यानंतर कोकणातील मानवाने निर्माण केलेली अश्मयुगीन हत्यारे व सुक्ष्मास्त्रे सापडली आहेत ती दाखवून माहिती दिली. Abhyankar College visited Katalshilp Research Centre
रत्नागिरीमधील या जागतिक वारशाच संशोधन व संवर्धन करण्यासाठी कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या संशोधन केंद्रात विविध क्षेत्रातील संशोधक काम करत आहेत. सर्वेक्षण करणे, मॅपिंग करणे, स्केचेस तयार करणे, संशोधन प्रबंध तयार करणे, नवीन शोध प्रकाशित करणे अशा अनेक प्रकारची कामे येथे केली जातात. भविष्यात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे संधी देणार असल्याचं सुधीर रिसबुड यांनी संगितले. Abhyankar College visited Katalshilp Research Centre
या संस्थेत सुधीर रिसबुड, ऋत्विज आपटे, तार्किक खातू, निरंजन सागवेकर, दिव्यांश कुमार सिन्हा, स्नेहा दबडगाव, रघुनाथ बोकिल, रेणुका जोशी, मधुसुदन राव, गार्गी परुळेकर कार्यरत आहेत. या क्षेत्रभेटीत महाविद्यालयाचे 30 विद्यार्थी सहभागी झाले. सोबत प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. दत्तात्रय माळवदे, प्रा. अभिजित भिडे, प्रा. गुरुप्रसाद लिंगायत, प्रा. स्नेहा बाणे या शिक्षकांनी सहभाग घेतला. Abhyankar College visited Katalshilp Research Centre