गुहागर, ता. 24 : डाँ. विनय नातू फँन क्लबच्यावतीने मार्गताम्हाने येथील अनंतराव शिर्के मंगल कार्यालयात माजी आमदार डाँ. विनय नातू यांचा ६० वा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळीआमदार निकम हे उपस्थित होते. Abhishtchintan ceremony of Natu
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, राजकारणात काहींना खोटे बोला पण रेटून बोला अशी सवय असते. नातू मात्र, त्या स्वभावाचे नाहीत. त्यांचे माझे पूर्वापासून कौटुंबिक संबंध असून डाँ. तात्यासाहेब नातू यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. चांगल्या स्वभावाच्या माणसांना उशिरा का होईना न्याय मिळतो. ते आज पक्षामध्ये सर्वात जुने नेते आहेत. त्यांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या चांगल्या स्वभावगुणांमुळे ते मागे निश्चित पडले असतील, पण ही कसर त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीत नक्की भरुन निघेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना डाँ. नातू म्हणाले, आता १४ वर्षाचा वनवास झाला. जो तो नेता म्हणायचा, आता पुढच्यावेळी तूच असा विषय २००८ सालापासून सुरु होता. आता पुढे काय निर्णय व्हायचा ते होईल, आपण काम करत रहायचे, अशी नातू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. Abhishtchintan ceremony of Natu
या कार्यक्रमाला जयंद्रथ खताते, अबू ठसाळे, सौ. चित्रा चव्हाण, सौ. निलम गोंधळी, विनय नातू यांची पत्नी सौ. विनिता नातू, सतीश मोरे, वसंत ताम्हणकर, शरद शिगवण यांच्यासह बहुसंख्य हितचिंतक, महिला भगिनी उपस्थित होते. यावेळी डाँ. नातूंचे ६० दिवे प्रज्वलीत करुन औक्षण करण्यात आले. तसेच चाँकलेटने बनविलेला भव्य हार मान्यवरांच्याहस्ते घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार निकम यानी केक भरवून व मोठी प्रतिमा भेट देऊन नातूंचा सन्मान केला. सौ. विनिता नातू यांनी साडी व श्रीफळ देऊन त्यांचा महिलांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश सुर्वे यांनी तर सूत्रसंचालन सखी थरवळ यांनी केले. रात्री उशिरा माझी खासदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी भेट देऊन नातूंना शुभेच्छा दिल्या. Abhishtchintan ceremony of Natu