संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 30 : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १६, १७, १८ डिसेंबर २०२४ रोजी आर.पी.पी. विद्यालय पालशेत या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. Aabaloli College’s success in science Exhibition
या विज्ञान प्रदर्शनात कु. अद्वैत वैभव ढवळ व कु. चैतन्य दीपक वैद्य यानी मांडलेल्या ‘स्मार्ट बस’ प्रतिकृतीचा प्राथमिक गटात तृतीय क्रमांक आला. माध्यमिक गटामध्ये कुमार रुद्र राकेश साळवी व आर्यन सचिन पांचाळ यांनी मांडलेल्या मळणी यंत्र या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक आला. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थी गटामध्ये कुमार वल्लभ महेंद्र ठाकूर याने विद्यार्थ्याने मांडलेल्या ‘सुरक्षित हेल्मेट’ या प्रतिकृतीचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला. अशाप्रकारे विद्यालयाने उज्वल यश संपादन केल्याबद्दल तालुक्यातील सर्व स्तरांमधून विद्यालयाचा गौरव करण्यात येत आहे. सदर प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. दिनेश नेटके, श्री. वैभव ढवळ, श्री.नितीन जगताप यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. Aabaloli College’s success in science Exhibition
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डि. डी. गिरी, लोक शिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अविनाश कदम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Aabaloli College’s success in science Exhibition