• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सामाजिक वनीकरण विभागातर्फे चित्रकला स्पर्धा

by Guhagar News
April 15, 2025
in Guhagar
50 1
0
Painting Competition by Forestry Department
99
SHARES
282
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे विद्यालयातील आर्या जानवळकर व समृद्धी आंबेकर प्रथम

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पाटपन्हाळे विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्यतर्फे निसर्गाबाबत जनजागृती होणे व वृक्ष संवर्धन करणे या उद्देशाने दोन गटात चित्रकला स्पर्धा नुकतीच संपन्न झाली होती. या चित्रकला स्पर्धेसाठी वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन व वृक्षतोडीला विरोध करणारी मुले असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गट क्रमांक १ – इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये आर्या अनंत जानवळकर व गट क्रमांक २ –  इयत्ता नववी ते दहावीमध्ये कु. समृद्धी सुरेश आंबेकर यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. यशस्वी विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री.दबडे, श्री.माळी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. Painting Competition by Forestry Department

चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम आर्या अनंत जानवळकर, द्वितीय ओजस्वी सुधीर वासनिक व तृतीय क्रमांक नेहा संदीप निवाते यांनी पटकावला. गट क्रमांक २ मध्ये प्रथम समृद्धी सुरेश आंबेकर, द्वितीय श्रीया संतोष नागेश,  तृतीय क्रमांक मैथिली विनोद कदम यांनी संपादन केला. सदरच्या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. चित्रकला स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक एस.बी.मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी व सहभागी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री.दबडे, श्री.माळी, मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी.डी.नेरले, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Painting Competition by Forestry Department

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPainting Competition by Forestry DepartmentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share40SendTweet25
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.