गुहागर, ता. 18 : “साई माऊली कलामंच” (मुंबई) यांचा तिसरा प्रयोग नुकताच रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, चर्नी रोड, मुंबई येथे संपन्न झाला. कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेल्या या कलामंचचा लोककला नमन कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “Sai Mauli Kalamanch”


या कार्यक्रमाला अधिसभा सदस्य महाराष्ट्र शासन सन्मा. किसन सावंत साहेब, उपशाखा प्रमुख – सन्मा.सचिन राऊत साहेब, युवती शाखा अधिकारी – सन्मा.अनुष्का हजारे मॅडम , सागर डावल, अनंत मोरे, संतोष कोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार सन्मा.रमेश ठोंबरे व सन्मा.सचिन ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे सन्मा.किसन सावंत साहेब व सहकारी यांनी शंकर कळंबटे व पत्रकार नरेश मोरे यांचा शाल व श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. “Sai Mauli Kalamanch”


या नमन कार्यक्रमामध्ये गणेश आराधना, गण-गवळण, राधा- कृष्ण प्रेमकहाणी व प्रेमगीत , रासलीला सादर करण्यात आली. व शेवटी लोकनाट्यातुन एकुलता एक मुलगा स्वतःच संसार स्वतः उद्ध्वस्त कसा करतो आणि अठरा विश्व दारिद्रय असलेलं गरिब आई-बाप काबाडकष्ट करून मुलाला शिक्षण देतात. त्याचा परतावा म्हातारपणी आजारात बाप मरेपर्यंत न बघता केवळ छोटा नातु आजी-आजोबांच्या बाजुने बापाची कान उघडणी करतो. हे अत्यंत सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण नमन कार्यक्रमात रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रयोगासाठी सचिन ठोंबरे – ९९२०७८२३८१, नरेश मोरे – ७०३९४९८६९९, रमेश ठोंबरे – ७३०४२३६१९६ यांच्याशी संपर्क साधावा. “Sai Mauli Kalamanch”

