गुहागर, ता. 06 : तालुक्यातील पाचेरी सडा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एलआयसी महामंडळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा MDRT-USA-2025 हा पुरस्कार प्राप्त केला आहे. गेली पाच वर्ष हा पुरस्कार ते प्राप्त करीत आहेत. त्यांचे प्रामाणिकता, उच्च विचारसरणी आणि आर्थिक नियोजनाचा 15 वर्षाचा अनुभवाच्या आधारे ते हा पुरस्कार प्राप्त करत आहेत. MDRT Award to Bharat Khambe
या पुरस्काराबद्दल बोलताना भरत खांबे म्हणाले की, माझे विमाधारक, मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांच्या सहकार्यामुळे हे मी शक्य करू शकलो आहे. त्याचप्रमाणे माझे विकास अधिकारी मा.अमोल चाळीसगावकर शाखाप्रमुख व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्व हितचिंतकांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो, असे खांबे यांनी सांगितले. MDRT Award to Bharat Khambe