गुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट, झिरो बॅलन्स अकाउंट बंद होणार आहेत. कारण सुरक्षित, पारदर्शी आणि कुशल पद्धतीनं बँकिंग व्यवहार होण्यासाठी तसेच बँक खातं हॅक करण्याच्या घटनांना आळा बसावा यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. Bank account will be closed
‘हे’ तीन बँक अकाउंट बंद होणार
डोरमेंट अकाउंट : हे असं अकाउंट असतं ज्यात 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार करण्यात आला नाही किंवा झाला नाही अशी इनएक्टिव अकाउंट बंद होणार आहेत.
इनएक्टिव अकाउंट : ही अशी अकाउंट आहेत ज्यात ठराविक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर झालेले नाहीत. ही खातीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
झिरो बॅलन्स अकाउंट : ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून रक्कम जमा झालेली नाही आणि ज्यांची शिल्लक रक्कम शून्य आहे. अशी अकाउंट देखील बंद करण्यात येणार आहेत. Bank account will be closed