रत्नागिरी, ता. 24 : शासकीय रुग्णालयात दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभागात त्यांची पत्नी स्नेहल साठे व मुलगी छाया साठे यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोग व्हावा, या इच्छेने दिवंगत साठे यांचा देह दान केला. त्यांनी 18 डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महविद्यालयात येऊन देहदानाचा संकल्प केला होता. First body donation in government hospital
देहदानाचे महत्व
शरीररचना शास्त्र विभागामध्ये आलेल्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण तसेच संशोधन यासाठी केला जातो. या संपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव व विभागातील कर्मचारी यांनी देहदान व त्यानंतरची प्रकिया पूर्ण केली. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे देखील सहकार्य मिळाले. अधिष्ठाता डॉ. रामानंद व डॉ. सय्यद यांनी देहदान संकल्प करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. First body donation in government hospital