नागपूर च्या राजभवनात होणार शपथविधी!
गुहागर, ता. 14 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. Oath ceremony in Nagpur
भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल, अशी माहिती समोर येत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्याची संभाव्य यादी एबीपी माझाने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रथमच नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात सना मलिक आणि इंद्रनील नाईकांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. Oath ceremony in Nagpur
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अजित पवार, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे