बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेतर्फे आयोजन
गुहागर, ता. 05 : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बौधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे (शृंगारतळी) येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जनतेसाठी अस्थिकलश दर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. Mahaparinirvana day at Janwale
गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:१५ वाजल्यापासून शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश जनतेला दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला आणि बुध्द पुजा पाठाला, बुद्ध वंदनेला आणि विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सभेला गुहागर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने वेळेवर उपस्थित रहावे. असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे यांनी केले आहे. Mahaparinirvana day at Janwale