वैभव खेडेकर, मनसेतर्फे प्रमोद गांधी रिंगणात
गुहागर, ता. 29 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रमोद गांधी यांनी काल गुहागर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडकर उपस्थित होते. ही लढाई प्रस्थापितांविरुध्द विस्थापित अशी आहे. गेल्या 60 वर्षात केवळ दोन घराणी गुहागरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. आता मतदारांनी नव्या चेहेऱ्याला संधी द्यावी. असे आवाहन यावेळी वैभव खेडेकर यांनी केले. Pramod Gandhi from MNS in arena
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुहागर तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी शृंगारतळीच्या मनसे कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर व्याडेश्र्वर मंदिरापर्यंत पदयात्रा निघाली. व्याडेश्र्वराचे दर्शन घेतल्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात येवून प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. राज ठाकरे गुहागर आणि दापोलीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे यावेळी वैभव खेडेकर यांनी सांगितले. Pramod Gandhi from MNS in arena