आरपीआय आठवले गटातर्फे संदेश मोहिते रिंगणात
गुहागर, ता. 29 : भाजपच्या जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याचबरोबर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाचे संदेश मोहिते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. Independent candidature of Santosh Jaitapkar
महायुतीकडून भाजपला उमेदवारी अर्ज न मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून माझ्यावर उमेदवारी अर्ज भरण्याबाबत दबाव होता. त्यामुळे आपण अर्ज भरल्याचे जैतापकर यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, विनय नातू यांच्या नावाची चर्चा सुरु होती त्यावेळी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची माझी भुमिका होती. मात्र महायुतीकडून भाजपला उमेदवारीच मिळाली नाही. नाराज कार्यकर्त्यांनी आग्रह केला. त्यामुळे सोमवारी भाजपच्या पदाचा राजीनामा देवून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोकणातील खेडी रोजगाराविना, उद्योगधंद्यांविना ओस पडत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Independent candidature of Santosh Jaitapkar
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातर्फे संदेश मोहीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे पट्टे त्यांनी गळ्यात घातले होते. त्यांच्या वाहनावरही सर्व पक्षांचे झेंडे लावण्यात आले होते. आमच्या पक्षाकडून अधिकृतरित्या आम्हाला कोण उमेदवार याची माहितीच दिली गेली नसल्याचे मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले. आरपीआयची कोकणात ताकद आहे. आम्ही शासनाच्या माध्यमातून अनेक गावात विकासकामे केली आहेत. त्यामुळे महायुतीने आम्हाला संधी द्यायला हवी. ही निवडणूक आम्ही पक्षाध्यक्ष ॲड. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती म्हणूनच लढविणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. Independent candidature of Santosh Jaitapkar