• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्रातील तरुणांनी युरोपात साजरा केला स्वातंत्र्यदिन

by Ganesh Dhanawade
August 19, 2024
in Bharat
156 1
2
Independence Day celebrated in Europe
306
SHARES
874
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

परदेशी नागरिकांना वाटली मिठाई

गुहागर, ता. 19 : गेली दीड वर्ष महाराष्ट्रातील अनेक तरुण युरोपातील सलोवकीया याठिकाणी जाग्वार लँड रोवर कंपनीत कामासाठी आहेत. तेव्हापासून राज्यातील प्रत्येक सण साजरे करत असताना स्वातंत्र्यदिन देखिल त्याच पद्धतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या तरुणांनी आपल्या आनंदात परदेशी नागरिकांनाही सहभागी करून पेढे, जिलेबीचे वाटप केले. Independence Day celebrated in Europe

Independence Day celebrated in Europe

प्रत्येक भारतीयांसाठी १५ ऑगस्ट हा खूप खास आणि इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाचे प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी केवळ आपला देशच स्वतंत्र झाला नाही तर या दिवसानंतर पहिल्यांदाच आपल्याला आपले मूलभूत अधिकार मिळाले. हा दिवस देशभरातील लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करतो आणि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकराष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देतो. हा केवळ राष्ट्रीय सण नसून या देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या तन, मन आणि धनाने बलिदान दिले, त्या शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी भारत मातेचा जयजयकार करून संपूर्ण आसमंत दणाणून सोडला. त्यांच्या या उत्सवात जाग्वार लँड रोवर कंपनी व्यवस्थापन सहभागी झाले होते. तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर उपस्थित असलेल्या परदेशी नागरिकांना जिलेबीचे वाटप केले. Independence Day celebrated in Europe

जाग्वार लँड रोवर कंपनीत गुहागर तालुक्यातील निखिल रेवाले याच्यासह इतर  जिल्ह्यातील ऋषी चव्हाण, निखिल बोराडे, तन्माई सुतार, ऋषी साळवी, रितेश शिगते, केतन सोनार, नितेश तुपे, राज सुर्वे, प्रशांत कोरडे आदीसह सुमारे 200 राज्यातील तरुणांनी एकत्र येऊन हा स्वातंत्र्यदिन साजरा केला. Independence Day celebrated in Europe

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndependence Day celebrated in EuropeLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share122SendTweet77
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.