गुहागर, ता. 06 : सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करणेत येत आहे की, दि.12 जुलै 2024 रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर तपासणी शिबिरास अस्थिव्यंग मानसिक तसेच अंध या संबधित दिव्यांग तपासणी करणेत येणार आहे. असे आवाहन डॉ भास्कर जगताप, जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी यांनी केले आहे. Disability screening camp at Kamthe

तपासणी करीता 1. www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावर फॉर्म भरणे व त्याची पावती घेणे. 2. आधार कार्ड झेरॉक्स 3. रेशन कार्ड झेरॉक्स 4. जुने प्रमाणपत्र 5. जुने आजाराचे कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. (शिबिरात ऑनलाईन फॉर्म भरण्यात येणार नाहीत) तरी उपजिल्हा रुग्णालय कामथे, ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे 10 ते 2 या वेळेत सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ भास्कर जगताप, जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हा शासकिय रुग्णालय रत्नागिरी यांनी केले आहे. Disability screening camp at Kamthe