निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी
रत्नागिरी, ता. 13 : आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पाडावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे श्री. सूर्यवंशी यांनी मान्सून तयारीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपत्तीच्या अनुषंगाने आपत्ती निवारण कक्ष, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व इतर विभागांचा आढावा घेतला. The Sub-District Officer reviewed
श्री. सूर्यवंशी म्हणाले, प्रत्येक विभागाने कंट्रोल रुम २४ X ७ ॲक्टीव्ह ठेवावेत. आलेल्या आपत्ती माहितीबाबत रेकॉर्ड ठेवावा. संबंधित विभागाकडे देऊन त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. पर्जन्यमान तसेच नुकसानीबाबत माहिती नियमित पाठवावी. आरोग्य विभागाने या कालावधीत येणारे साथ रोग तसेच सर्पदंश च्या अनुषंगाने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालय, प्राथमिक रुग्णालयात ठेवा. पाणीपुरवठा विभागानेही पाणी स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने तसेच त्यामुळे आरोग्य, साथीचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. The Sub-District Officer reviewed
आपल्या विभागाशी संबंधित बातम्या कोणत्याही माध्यमांवर प्रसिध्द झाल्यास, त्याबाबत आपत्तीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी. नकारात्मक बातम्यांबाबत वस्तुस्थितीजनक योग्य खुलास्याची बातमी द्यावी. आपत्तीच्या अनुषंगाने जी ठिकाणे प्रतिबंधित करावयाची आहेत, त्याबाबतची माहिती द्यावी. त्यावर कार्यवाही करण्यात येईल. The Sub-District Officer reviewed