रत्नागिरी, ता. 24 : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे उद्या २५ मे रोजी कोकण विभागीय भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा आयोजित केला असून, यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड येथील वधू-वर सहभागी होणार आहेत. Bhandari community gathering on bride
मांडवी येथील गगनगिरी कृपा मंगल कार्यालयात (८० फुटी हायवे) हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. यामध्ये इच्छुक नोंदणीकृत, नवीन नोंदणी वधू-वर व घटस्फोटीत वधू-वर यांनी व्यक्तिशः व पालकांसहित उपस्थित रहावयाचे आहे. उपवर मुला-मुलींनी आपला रंगीत फोटो, जन्मपत्रिका झेरॉक्स आणि बायोडेटा सोबत घेऊन यावे. नवीन नोंदणी करणार्यांना ३०० रुपये शुल्क राहील. यापूर्वी नोंदणी केलेल्या मुला-मुलींनाही या मेळाव्यात सहभागी होता येईल. दुपारी अल्पोपहाराची व्यवस्था केली जाईल. Bhandari community gathering on bride
रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ वेळोवेळी वधू-वर मेळावे घेऊन ज्ञातीतील मुला-मुलींचे विवाह जुळवण्याचे कार्य करीत आहे. या मेळाव्याला इच्छुक वधू-वर व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मेळावा प्रमुख ऍड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व प्रत्यक्ष भेटीसाठी भागिर्थी भुवन, गाळा नं. ४, खालची आळी, रत्नागिरी. मोबा. क्र. ८९८३५२४५९०, चंद्रहास विलणकर (९७६३८२४३११), कांचन मालगुंडकर (८९९९३३२७५७), सौ. दया चवंडे (९८६०६२६१२९), अमृता मायनाक (९४२०९१०३६९), ऍड. सौ. प्रज्ञा तिवरेकर (९४२२०१०८८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे कळवण्यात आले आहे. Bhandari community gathering on bride