• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 October 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

“साई माऊली कलामंच” तर्फे मुंबईत नमन

by Guhagar News
March 8, 2024
in Maharashtra
127 1
0
Naman of "Sai Mauli Kalamanch"
250
SHARES
713
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आर्किटेक, प्रविण काटवी यांच्या स्मरणार्थ दि. १० मार्च रोजी आयोजन

गुहागर, ता. 08 : कोकण ही कलेची पंढरी म्हणून ओळखळी जाते. याच कोकणात नमन , जाखडी नृत्य ही लोककला फेमस आहे. नमन ही महाराष्ट्रामधील एक लोककला आहे. लोककलेला वाव मिळाला आणि कोकणातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळाली म्हणून कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेला कलामंच म्हणजे “साई माऊली कलामंच” (मुंबई). यांचा नमनाचा दुसरा प्रयोग रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. मराठी साहित्य संघ मंदिर,  चर्नी रोड, (मुंबई ) येथे आयोजित केला आहे. या नमना दरम्यान दमदार खेळे, श्री गणेश आराधना, गण, राधा – कृष्णाची प्रेमलीला, गवळण, पेंद्या वाकड्याची आगळी वेगळी धमाल आणि धार्मिक वगनाट्य “साईलीला” या नमनात दाखविण्यात येणार आहे. Naman of “Sai Mauli Kalamanch”

या कलामंचाचे यशस्वी कलाकार पुन्हा एकदा सज्ज झाले असून कोकणची लोककला जपणारा एक मराठमोळा कार्यक्रम.  लेखक/सुत्रसंचालन/गीतरचना – सचिन ठोंबरे, दिग्दर्शक – रमेश ठोंबरे , गायक – संदेश पालकर, गायिका – शिवन्या मांडवकर, मृदंग – दिलीप आंबेकर, ढोलकीपटटू – समिर मास्कर, संगीतकार – संदेश आंबेकर/प्रमोद आंबेकर, बॅंन्जो – अजय धनावडे, पॅड – कुंदन साळवी, नृत्यांगना – दिपाली आंबेकर, रंजना म्हाब्दी, अंकिता गोणबरे, प्रियांका आंबेकर, साक्षी डिंगणकर, विचार्ती ठोंबरे, हिरण्या आंबेकर तसेच इतर सह कलाकार आहेत. विशेष सहकार्य सन्मा. श्रद्धा काटवी मॅडम यांचे लाभले आहे. Naman of “Sai Mauli Kalamanch”

“नमन” या लोककलेवर प्रेम करणा-या तमाम कोकणवासीय, मुंबईकर, रशीक प्रेक्षकांनी सहकुटुंब, सहपरिवार समवेत उपस्थित राहुन हा कार्यक्रम पहावा असे कलामंचातर्फे आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सचिन ठोंबरे – ९९२०७८२३८१ , रमेश ठोंबरे – ७३०४२३६१९६ , नरेश मोरे – ७०३९४९८६९९ यांच्याशी संपर्क साधावा. Naman of “Sai Mauli Kalamanch”

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNaman of "Sai Mauli Kalamanch"News in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.