गुन्हा व दंडाच्या शिक्षेची तरतुद
गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून गुहागर शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यात येत आहे. आज २ ऑक्टोबरपासून याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हयाची व दंडाची तरतुद करण्यात आली आहे. तर गेले १५ दिवस शहरातील महत्वाची ठिकाणी स्वच्छ करण्याची मोहीम राबवीली जात आहे. Zero Waste Campaign of Guhagar Nagar Panchayat
गुहागर शहरातील मच्छिमार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. मच्छिमार्केटच्या बाजुला असलेल्या कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य गेली तीन दिवस उचलले जात होते. मात्र त्यानंतर तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला असून मच्छिविक्रेत्यांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातातील १ ते दिड किलोमिटर अंतरावरील मुख्य मार्गावर मोठया प्रमाणात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. तेथील जागा नगरपंचायतीने स्वच्छ केली आहे. यावेळी नगरपंचायत कर्मचारी यांच्याबरोबर कॉलेजचे विद्यार्थी यांचाही सामावेश करून घेऊन स्वच्छता करण्यात आली आहे. तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुचे वाढलेले गवतही स्वच्छ करण्यात आले आहे. नगरपंचायतीने संपूर्ण शहरात घरपट स्वच्छतेसंदर्भातील काटेकोर अंमलबजावणीचे प्रसिद्धीपत्रकच काढले आहे. माझा कचरा माझी जबाबदारी, कचऱ्याचे वर्गीकरण करा स्वच्छतेची कास धरा, अशा घोषवाक्यांनी शूक्य कचरा मोहीम राबवीली आहे. Zero Waste Campaign of Guhagar Nagar Panchayat


ओला कचरा, सुका कचरा, घरगुती अपायकारक कचरा स्वतंत्र करून देण्याचे आवाहन केले आहे. याची अंमलबजावणी आज २ ऑक्टोबरपासून केली असून एकत्रीत कचरा देणाऱ्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबर दंडाचीही तरतुद करण्यात आली आहे. कचरा देताना वर्गीकरण करून न दिल्यास प्रत्येक प्रसंगाला २०० रूपये दंडा लावण्यात आला आहे. दुसऱ्यावेळेलाही कचऱ्याचे वर्गीकरण करून न दिल्यास ३०० रूपये दंड आकारला जाणार आहे. मोठया प्रमाणात कचरा निर्माण करणे जनकाला पहिल्यावेळी ३००० रुपये दंड तर दुसऱ्यावेळेला तोच प्रकार केला तर ९००० रूपये दंड जाहीर केला आहे. कचरा जाळल्याबद्दल ५००० रूपये दंड, सार्वजन सभा, समारंभ संपल्यानंतर चार तासांच्या आत स्वच्छता न केल्याबद्दल स्वच्छता अनामत रक्कम जमा केली जाणार आहे. बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर, विक्री, खरेदी केल्यास पहिल्यावेळेला ५००० रूपये दंड, दुसऱ्या वेळेला १०००० रूपये दंड तर तिसऱ्यावेळेला तोच प्रकार केला तर मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून २५००० रूपये दंड जाहीर केला आहे. Zero Waste Campaign of Guhagar Nagar Panchayat


याचबरोबर रस्ता मार्गावर कचरा करणाऱ्याला १५० रूपये, उघडयावर लघवी करणाऱ्याला १०० रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १०० रूपये तर उघडयावर सौच करणे याला ५०० रूपये दंडाची शिक्षा जाहीर केली आहे. गुहागर शहर कचरामुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली असून शहराच्या स्वच्छतेसाठी शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे. Zero Waste Campaign of Guhagar Nagar Panchayat