गुहागर, ता. 15 : जि. प. वेलदूर नवानगर शाळेमध्ये योगा शिबिराचे औचित्य साधून वेलदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. कुंभार यांचा मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे हस्ते तर योगा प्रशिक्षिका अदिती धनावडे यांचा अंजली मुद्दमवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Yoga camp at Veldoor Nawanagar School


यावेळी डॉक्टर कुंभार यांनी आरोग्यविषयक माहिती दिली. तर धनावडे मॅडम यांनी विविध योग प्रकार योगासनांचे महत्त्व, उत्तम आरोग्य विषयक सवयी, सूर्यनमस्काराचे प्रकार ही माहिती दिली. यावेळी शाळेच्या शिक्षिका सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, ग्रामस्थ सौ खडपकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे मॅडम यांनी केले. Yoga camp at Veldoor Nawanagar School