दुर्गादेवी देवस्थानतर्फे मोफत शासकीय योजनांची नोंदणी
गुहागर, ता. 23 : वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव रविवार दि. 15 ऑक्टोबर 2023 ते सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस शासकीय योजनांची नोंदणी आणि निसर्ग उपासनेचा संदेश देणारा यज्ञ, ग्रामदेवता पुजारी सन्मान, सुवासिनी व कुमारीका पूजन हे प्रमुख कार्यक्रम यावर्षी देवस्थानचे आयोजित केले आहेत. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली. Yagya of nature worship during Navratri festival
नवरात्र उत्सवातील 10 दिवस दररोज सकाळी 6.30 वा. श्रींची षोडषोपचार पूजा, सकाळी 9 ते 9.30 वा. वेदपठण, सकाळी 9.30 ते 11.30 वा. सप्तशती पाठ वाचन, दुपारी 12 ते 2 वा. प्रसाद, दुपारी 3 ते सायं. 5 वा. श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव, संध्या 7.15 वा. श्रींची सायंपूजा, गोंधळ, आरती व मंत्रपुष्प, रात्रौ 9.30 ते 11 वा. श्री अजेय बुवा रामदासी, सज्जनगड यांची समर्थ रामदास स्वामींच्या पदांवर आधारित देवीची संगीतमय व्याख्याने असे कार्यक्रम होणार आहेत. Yagya of nature worship during Navratri festival


नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने यावर्षी शासनाच्या विविध योजनांची ऑनलाइन नोंदणी उपक्रम देवस्थान राबविणार आहे. यामध्ये किसान सन्मान, श्रमयोगी मानधन, आभा हेल्थ कार्ड, असंघटित बांधकाम कामगार या योजनांची नोंदणी तसेच नव मतदारांची नोंदणी मंदिरात केली जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते होणार आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ऑनलाइन नोंदणी मोफत आहे. नवरात्र उत्सवातील 9 दिवस सकाळी 10.30 ते सायं. 4 या वेळेत या योजनेचा लाभ घेतर येणार आहे. Yagya of nature worship during Navratri festival


रविवारी (ता. 15) दुपारी 3.30 वा. कलावती आई भजन मंडळ, वरचापाट यांचे सुश्राव्य भजन, सायं. 7.30 वा. गोपाळकृष्ण संगीत आरती मंडळाची आरती व मंत्रपुष्प होइल. सोमवारी (ता. 16) सकाळी 10 वाजता तालुक्यातील ग्रामदेवतेची पुजा करणाऱ्या पुजाऱ्यांचा सन्मान देवस्थानतर्फे केला जाणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, डॉ. विवेक नातू उपस्थित रहाणार आहेत. गुरुवारी (ता. 19) सकाळी 10 वा. 108 सुवासीनींचे पूजनाचा कार्यक्रम सौ. शिल्पाताई मराठे राजापूर व सौ. वर्षाताई भोसले मुंबई यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी (ता. 22) 108 कुमारीकांचे पूजन दुर्गादेवी मंदिरात केले जाणार आहे. सोमवारी (ता. 23) नवरात्र उत्सवाची सांगता नवचंडी हवन व रात्री लळीताचे किर्तनाने होईल. Yagya of nature worship during Navratri festival
श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव
महिलांसह अनेक भक्तांचा आकर्षण बिंदु असलेला दुर्गादेवी मंदिरातील कार्यक्रम म्हणजे श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव. दुर्गादेवीला वर्षभर नेसवण्यात येणाऱ्या साड्या प्रसाद म्हणून घेण्यासाठी गुहागर तालुक्यासह मुंबई, पुण्यातील भक्त आवर्जुन या कार्यक्रमाला येत असतात. यावर्षी देवस्थानने 9 दिवस दुपारी 3 ते 5 श्रींच्या महावस्त्रांचा लिलावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. Yagya of nature worship during Navratri festival