• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारताची लोकसंख्या १४४ कोटी

by Guhagar News
April 18, 2024
in Bharat
87 1
0
170
SHARES
487
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चीनलाही टाकले मागे; अहवालातून आकडेवारी आली समोर

नवीदिल्ली, ता. 18 : भारताच्या ताज्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा अहवाल (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) समोर आला आहे. यूएनएफपीए म्हणजेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये ० ते १४ वयोगटातील २४ टक्के लोकसंख्या आहे, असा अंदाज आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या जागतिक लोकसंख्या २०२४ च्या अहवालात भारताची लोकसंख्या ७७ वर्षांमध्ये दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. India’s population is 144 crores

सध्या भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. (World’s most populous country)चीन देशाची लोकसंख्या १४२.५ कोटी इतकी आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताने चीनला मागे टाकलं असल्याचं दिसत आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. UNFPA च्या अहवालानुसार लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर आहे. अहवालात समोर आलंय की, भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ या वयोगटातील आहे, तर १७ टक्के लोकसंख्या १० ते १९ या वयोगटातील आहे. एवढेच नाही तर १० ते २४ वयोगटात २६ टक्के, (India Population 144 Crores) तर १५ ते ६४ वयोगटातील संख्या ६८ टक्के आहेत. India’s population is 144 crores

याव्यतिरिक्त, भारतातील ७ टक्के लोकसंख्या ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाची आहे. पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे. यूएनएफपीएच्या ताज्या अहवालानुसार सन २००६ ते २०२३ भारतातील लोकसंख्येपैकी २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले आहेत. त्याचसोबत भारतात माता मृत्यूच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. ६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनामध्ये समोर आलं आहे की, सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांमध्ये माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. काही जिल्ह्यांमध्ये माता मृत्यूचं प्रमाण एक लाखामागे ११४ ते २१० आहे. India’s population is 144 crores

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorld's most populous countryगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.