गुहागर, ता. 05 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्यालय वरवेली येथे रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक दिव्यांग सहायता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग बंधू -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्प हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ज्या दिव्यांगानी उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला. World Day of Persons with Disabilities in Guhagar


संस्थेचे अध्यक्ष श्री.उदय रावणंग यांनी प्रास्ताविक केले. या जागतिक दिव्यांग सहायता दिनाचे महत्व व उद्देश सांगितला. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संस्थेमार्फत काथ्या प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी गरजू दिव्यांगाना कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित दिव्यांग सभासदांनी आपली मनोगत व्यक्त केली. संस्था गेली २१ वर्ष हा उपक्रम अविरतपणे राबवीत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.संतोष कदम, श्री.संतोष घुमे, अनिल कुंभार, श्री.प्रकाश कांबळे, सौ.जोशी जोशी, श्री.प्रल्हाद मोरे, सौ.सुहानी आंबेकर आदींनी विशेष प्रयत्न केले. World Day of Persons with Disabilities in Guhagar


या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.उदय रावणंग, उपाध्यक्ष श्री.प्रकाश अनागुडे, सरचिटणीस श्री.सुनील रांजणे, खजिनदार श्री.सुनील मुकनाक, सल्लागार श्री.रत्नाकर पाटील, सदस्य श्री.प्रवीण मोहिते, श्री.अनिल जोशी, सौ.सानिका रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश अनागुडे यांनी तर सरचिटणीस श्री.सुनील रांजणे यांनी आभार मानले. World Day of Persons with Disabilities in Guhagar

