गुहागर, ता. 18 : शहरात प्रथमच शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी खेलो इंडिया वुमन्स जुदो लीग 2023 या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धेला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता मिळाली आहे. Women’s Judo League in Guhagar
महाराष्ट्र जुदो असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन गुहागर या होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्युदो खेळाडूंना यशस्वी महिला खेळाडुंचा खेळ पहाण्याची संधी मिळणार आहे. अशा मोठ्या संस्थाच्या स्पर्धांचे यजमानपद गुहागरला मिळणे ही देखील मोठी उपलब्धी आहे. Women’s Judo League in Guhagar
या निमित्ताने गुहागरचे क्रिडा क्षेत्रातील महत्त्व वाढणार आहे. भविष्यात विविध मोठ्या स्पर्धा गुहागरमध्ये यशस्वी होऊ शकतात हा संदेश या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून क्रिडा क्षेत्रात पोचु शकतो. म्हणूनच खेळ पहाण्यासाठी, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन रत्नागिरी जिल्हा जुडा संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे यांनी केले आहे. Women’s Judo League in Guhagar