रत्नागिरी, ता. 09 : महिला शक्ती जागृत करण्यासाठी महिला दिन आहे, असे मला वाटते. त्यामुळे सर्व महिलांनी सुप्त शक्ती जागृत करूया. देवाने एकतरी छंद दिलेला असतो, तो शोधा. आपले आत्मबळ वाढवा, त्यातून आनंद मिळतो. सुखाच्या मागे लागू नका, कारण वाटेत दुःख वाट्याला येणार. म्हणून आत्मिक समाधानाकरिता प्रयत्न करा. महिलांकडे युक्ति असते, त्यासोबत शक्ती आणि भक्तीसुद्धा करा. कष्ट, करा, व्यायाम करा, स्वत:वर प्रेम करा, असे आवाहन डॉ. निशीगंधा पोंक्षे यांनी केले. Women’s Day by CA Institute Branch
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मथुरा हॉटेलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांनी डॉ. पोंक्षे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉ. पोंक्षे यांची प्रकट मुलाखत सौ. दीप्ती पंडित यांनी घेतली. सूत्रसंचालन सीए मोनाली कुलकर्णी यांनी केले. या वेळी सर्व महिला, मुलींचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. Women’s Day by CA Institute Branch
या कार्यक्रमाला शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये यांच्यासह उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सीएंच्या फर्ममधील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच ज्येष्ठ सीए उपस्थित होते. Women’s Day by CA Institute Branch
यावेळी सीए अभिलाषा मुळ्ये यांनी सीए इन्स्टिट्यूटबद्दल माहिती दिली. माझ्या कार्यकाळात महिला दिनाचा हा पहिला कार्यक्रम असून यापुढे विविध उपयुक्त चर्चासत्रे, परिसंवाद कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनीही भाग घ्यावा, असे सांगितले. Women’s Day by CA Institute Branch
डॉ. पोंक्षे यांनी शिक्षण घेणारी मुलगी, विवाह ते चाळीशीपर्यंत व त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठ महिला अशा वयोगटातील महिलांकरिता मार्गदर्शन केले. पाली येथील बचत गटांच्या महिलांना विमान प्रवास, हॉटेल व्यवसाय याविषयी त्यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, मानसिक व शारीरिक दृष्टीने तुम्ही बलवान व्हा. एखाद्या कामाची जबाबदारी तोच घेतो जो दोन्ही दृष्टीने बलवान आहे. या कामासाठी परमेश्वर तथास्तु म्हणत असतो. आपण निष्काम भावनेने काम केले की आपले आत्मबळही वाढते. माझे शिक्षण पुण्यात झाले. १९८८ मध्ये विवाहानंतर रत्नागिरीत आले. पाली येथे सासरे व पतीची वैद्यकीय प्रॅक्टीस असल्याने त्याचा फायदा स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून काम करताना झाला. सासुबाईंनी खूप सांभाळून घेतले. मुलांच्या निमित्ताने मीसुद्धा पोहायला शिकले व पोहण्याच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून पदक मिळवले. सध्या आध्यात्मिक क्षेत्रात काम सुरू आहे. Women’s Day by CA Institute Branch