• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रिगल कॉलेजमध्ये महिला दिन साजरा

by Ganesh Dhanawade
March 12, 2024
in Guhagar
83 1
0
Women's Day at Regal College
163
SHARES
467
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारततळीमध्ये (Regal College Sringaratali) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून सौ मनाली आरेकर (ऍडव्होकेट,गुहागर) व सौ स्नेहा वरंडे(माजी नगराध्यक्षा, गुहागर) यांचा यशस्वी महिला सत्कार करण्यात आला. Women’s Day at Regal College

Women's Day at Regal College

या कार्यक्रमांमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या (Regal College Sringaratali) प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.सौ. मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उपस्थित पाहुण्यांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये सौ. मनाली आरेकर यांनी आजच्या काळातील स्त्रीने शिक्षणाच्या जोरावर पूर्वीच्या काळातील बंधने व अडचणींवर कशाप्रकारे मात केली आहे ते सांगितले. 21 व्या शतकातील स्त्री सगळ्या क्षेत्रांमध्ये अव्वल आहे असे सांगून महिला सबलीकरण अंतर्गत शासनाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आणि अधिकार आजच्या महिलांना आहेत असेही सांगितले त्यासाठी असलेल्या महिला तक्रार व निवारण समितीबद्द्ल माहिती दिली. कधी कधी या कायद्यांचा दुरुपयोग होताना दिसतो त्यामुळे कुटुंब व्यवस्था ढासळली गेली आहे. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी करावा, असे त्यांनी मार्गदर्शन केले. Women’s Day at Regal College

सौ स्नेहा वरंडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीचे महत्त्व समजावून सांगितले व स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार झालाय का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मुलींनी आपला जोडीदार निवडताना त्याचे कर्तृत्व पाहून मगच योग्य निवड करावी असेही त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच आपले कुटुंब आपले गाव तसेच आपला देश ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शांततेचा मार्ग अवलंबून अडचणींवर मात करत कठीण प्रसंगातून पुढे जावे असा सल्ला दिला. तसेच खूपच कमी अंतरावर तालुकावासियांसाठी इतके छान शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी रिगल एज्युकेशन सोसायटीचे आभार मानले. Women’s Day at Regal College

या दिनाचे औचित्य साधून रेगल कॉलेज शृंगारतळी मध्ये यशस्वी महिला वेशभूषा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी राजमाता जिजाऊ, येसूबाई, किरण बेदी, डॉ. सुमिता शिर्के, सिंधुताई सकपाळ, गरिमा अरोरा आदी यशस्वी महिलांची वेशभूषा साकारली. या स्पर्धेमध्ये सानिका धामणस्कर प्रथम,अर्पिता दुर्गोळी द्वितीय तसेच सानिका शिर्के ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्वालीहा घारे, गौरी घाणेकर व सानिया पालकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन संपन्न झाला. Women’s Day at Regal College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRegal College SringarataliUpdates of GuhagarWomen's Day at Regal Collegeगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.