• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्राच्या 21 लाडक्या बहिणी विजयी

by Mayuresh Patnakar
November 26, 2024
in Maharashtra
188 2
0
women mla winner list
369
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 26 : महाराष्ट्राच्या विधानसभेत यावेळी २१ महिला पोहोचल्या आहेत. त्यात १४ महिला या केवळ भाजपच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १० आमदारांमध्ये एकही महिला आमदार नाही. तर काँग्रेसची केवळ एकच महिला विधानसभेत पोहोचली आहे. women mla winner list

निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांनी महायुतीचं पारडं जड केलं. राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात असलेल्या २५० हून अधिक महिला उमेदवारांपैकी एकूण २१ महिला आमदार झाल्या आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींचा समावेश आहे. भाजपने राज्यभरात १८ महिलांना संधी दिली होती, तर शिवसेना शिंदे गट ८ आणि अजित पवार गटाकडून ४ अशा पद्धतीने महायुतीकडून ३० महिला उमेदवार रिंगणात होत्या. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार (राष्ट्रवादी) ११, शिवसेना (उद्धव ठाकरे) १० व काँग्रेसने ९ अशा ३० महिलांना तिकीट दिले होते.  60 महिला उमेदवारांपैकी  २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत. women mla winner list

महिला आमदारांची पक्षनिहाय यादी

भाजपच्या महिला नवनियुक्त आमदार – श्वेता विद्याधर महाले- चिखली, श्रीजया अशोकराव चव्हाण – भोकर, बोर्डीकर मेघना दीपक साकोरे- जिंतूर, स्नेहा पंडित- वसई, सुलभा गणपत गायकवाड – कल्याण पूर्व, मंदा म्हात्रे – बेलापूर, मनिषा अशोक चौधरी – दहिसर, माधुरी सतीश मिसाळ – पर्वती, मोनिका राजीव राजळे – शेगाव, नमिता अक्षय मुंदडा – केज, अनुराधा अतुल चव्हाण – फुलंब्री women mla winner list

शिंदे गटाकडून विजयी महिला –
मंजुळा गावित – साक्री, संजना जाधव – कन्नड

अजित पवार गटाकडून विजयी महिला –
सुलभा खोडे – (अमरावती), सरोज अहिरे – (देवळाली), सना मलिक – (अनुशक्तीनगर), आदिती तटकरे – (श्रीवर्धन)

महाविकास आघाडीठाकरे गट – ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व, प्रवीणा मोरजकर – कुर्ला,
काँग्रेस – ज्योती गायकवाड – धवारी women mla winner list

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarwomen mla winner listगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share148SendTweet92
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.