गुहागर, ता. 26 : महाराष्ट्राच्या विधानसभेत यावेळी २१ महिला पोहोचल्या आहेत. त्यात १४ महिला या केवळ भाजपच्या तिकीटावर निवडून गेल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या १० आमदारांमध्ये एकही महिला आमदार नाही. तर काँग्रेसची केवळ एकच महिला विधानसभेत पोहोचली आहे. women mla winner list
निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांनी महायुतीचं पारडं जड केलं. राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात असलेल्या २५० हून अधिक महिला उमेदवारांपैकी एकूण २१ महिला आमदार झाल्या आहेत. यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींचा समावेश आहे. भाजपने राज्यभरात १८ महिलांना संधी दिली होती, तर शिवसेना शिंदे गट ८ आणि अजित पवार गटाकडून ४ अशा पद्धतीने महायुतीकडून ३० महिला उमेदवार रिंगणात होत्या. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार (राष्ट्रवादी) ११, शिवसेना (उद्धव ठाकरे) १० व काँग्रेसने ९ अशा ३० महिलांना तिकीट दिले होते. 60 महिला उमेदवारांपैकी २१ महिलाच राज्यभरातून निवडून येऊ शकल्या आहेत. women mla winner list
महिला आमदारांची पक्षनिहाय यादी
भाजपच्या महिला नवनियुक्त आमदार – श्वेता विद्याधर महाले- चिखली, श्रीजया अशोकराव चव्हाण – भोकर, बोर्डीकर मेघना दीपक साकोरे- जिंतूर, स्नेहा पंडित- वसई, सुलभा गणपत गायकवाड – कल्याण पूर्व, मंदा म्हात्रे – बेलापूर, मनिषा अशोक चौधरी – दहिसर, माधुरी सतीश मिसाळ – पर्वती, मोनिका राजीव राजळे – शेगाव, नमिता अक्षय मुंदडा – केज, अनुराधा अतुल चव्हाण – फुलंब्री women mla winner list
शिंदे गटाकडून विजयी महिला –
मंजुळा गावित – साक्री, संजना जाधव – कन्नड
अजित पवार गटाकडून विजयी महिला –
सुलभा खोडे – (अमरावती), सरोज अहिरे – (देवळाली), सना मलिक – (अनुशक्तीनगर), आदिती तटकरे – (श्रीवर्धन)
महाविकास आघाडीठाकरे गट – ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व, प्रवीणा मोरजकर – कुर्ला,
काँग्रेस – ज्योती गायकवाड – धवारी women mla winner list