• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरंद येथे “रानभाज्या” आणि “कृषी महोत्सव”

by Manoj Bavdhankar
August 19, 2026
in Maharashtra
48 1
0
"Wild Vegetables" and "Agricultural Festival"
95
SHARES
271
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा स्तुत्य उपक्रम

गुहागर, ता. 19 : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सरंद येथे शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या “कृषी कन्या”च्या संयुक्त विद्यमाने आयोजित “रानभाज्या “आणि “कृषी महोत्सव प्रदर्शनाला “उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. “Wild Vegetables” and “Agricultural Festival”

या प्रदर्शनात शरदचंद्रजी पवार महाविद्यालय सावर्डे या महाविद्यालयाच्या कृषी कन्या पूर्वा जाधव, अनुष्का काजरोळकर, तन्वी सोलीम, प्रणाली थोरात, सुजाता बेंडबुडे या विद्यार्थिनींनी विविध प्रकारची कृषी अवजारे, कृषी पूरक मॉडेल, सहभागी ग्रामीण अभ्यास व मूल्यांकन (PRA) तसेच कृषी माहिती केंद्र प्रदर्शित करुन शेतीसाठी लागणाऱ्या “बियाणे आणि खते” यांची मौलिक माहिती दिली. “Wild Vegetables” and “Agricultural Festival”

"Wild Vegetables" and "Agricultural Festival"

या प्रदर्शन महोत्सवात अनेक प्रचलित आणि दुर्मिळ रानभाज्यांची मांडणी,ओळख करण्यात आली. यावेळी प्रत्येक भाजीचे वैज्ञानिक आणि आयुर्वेदा नुसार महत्व पटवून देण्यात आले. यावेळी माखजन हायस्कूलच्या हरितसेना आणि कृषी विभागातील विध्यार्थ्यांनीही यावेळी “रानभाज्या” प्रदर्शन केले. या विद्यार्थ्यांना विठ्ठल भोईर सर यांनी मार्गदर्शन केले. “Wild Vegetables” and “Agricultural Festival”

यावेळी बोलताना माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की,”रानभाज्या” ही आपली अनमोल संपत्ती आहे. जुन्या पिढीला याची संपूर्ण माहिती होती. आजच्या विध्यार्थ्यांनी ही माहिती करुन घेणे गरजेचे आहे. “रानभाज्यां मध्ये”खूप जीवनसत्वे असतात. कुपोषण दूर करण्यासाठी खरी ताकद ही रानभाज्यानंमध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाने पालेभाज्या, रानभाज्या खाल्ल्याच पाहिजेत असे शशिकांत घाणेकर यांनी आवर्जून सांगितले. “Wild Vegetables” and “Agricultural Festival”

यावेळी सह. सचिव दीपक शिगवण, सरंदचे उपसरपंच उमेश पवार, पोलीस पाटील नंदन भागवत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विश्वास पवार, प्रभावती गोटेकर, संतोष गोटेकर, मुख्याध्यापक महादेव परब, प्रा. अभिजित सुर्वे, रवींद्र पवार, विठ्ठल भोईर, कांचन जंगम, अभिजित सहस्त्रबुद्धे यांचेसह पालक – शिक्षक, विद्यार्थी आणि सरंद येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. “Wild Vegetables” and “Agricultural Festival”

Tags: "Wild Vegetables" and "Agricultural Festival"GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.