जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी सुसंधी
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील वेळणेश्वर येथिल महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात Artificial Intelligence & Machine Learning तसेच Artificial Intelligence & Data Science या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. अशी मान्यता मिळणारे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलेच महाविद्यालय आहे. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना आता AI अभ्यासक्रमासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. Approval of AI courses at Velneshwar College
या महाविद्यालयाला तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेऊन दोन अत्याधुनिक अभ्यासक्रमांना मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये Artificial Intelligence & Machine Learning (AIML) तसेच Artificial Intelligence & Data Science (AI & DS) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हे क्षेत्र वेगाने विकसित होत असून उद्योग, आरोग्य, शिक्षण, बँकिंग, शेती, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रांमध्ये AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून, नव्याने मंजूर झालेले हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहेत. Approval of AI courses at Velneshwar College
Artificial Intelligence & Machine Learning या अभ्यासक्रमामध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, रोबोटिक्स, नैसर्गिक भाषा प्रक्रिया (NLP), संगणकीय दृष्टी (Computer Vision) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर Artificial Intelligence & Data Science या अभ्यासक्रमामध्ये बिग डेटा, डेटा अॅनालिटिक्स, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा इंजिनिअरिंग आणि AI आधारित निर्णय प्रक्रिया यांवर विशेष भर दिला जाणार आहे.

महाविद्यालय प्रशासनाच्या मते, या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कुशल अभियंते घडविण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण, उद्योग प्रशिक्षण, प्रकल्प आधारित अध्ययन तसेच आधुनिक प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश पवार यांनी सांगितले की, “भविष्यातील तंत्रज्ञान लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने महाविद्यालय सातत्याने कार्यरत आहे. AI आधारित हे नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.” Approval of AI courses at Velneshwar College
या नव्या अभ्यासक्रमांमुळे कोकणातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरांमध्ये न जाता आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आपल्या परिसरातच घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. Approval of AI courses at Velneshwar College
