गुहागर, ता. 31 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व तालुका कृषी अधिकारी, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे रानभाजी महोत्सव, पाककला स्पर्धा , प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Wild Vegetable Festival at Regal College
या स्पर्धेसाठी परीक्षक व प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शामकांत शां. खातू (व्यावसायिक-ओनर हॉटेल अन्नपूर्णा गुहागर), मा. श्री. राजेंद्र माने (उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण), मा. डॉ. ओंकार निर्मळ (सहाय्यक प्राध्यापक, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते, दहिवली), मा. कपिल नंदकुमार चिंगळे (मंडळ कृषी अधिकारी, शृंगारतळी), मा. श्री. रोहन कुमार चोथे.(मंडळ कृषी अधिकारी, पालशेत) उपस्थित होते. Wild Vegetable Festival at Regal College
पावसाळी ऋतू मध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. याचेच औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्त्व त्यांची ओळख आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रिगल कॉलेजमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे मॅडम यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर मा. श्री. शामकांत खातू यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. Wild Vegetable Festival at Regal College
वेगवेगळ्या रानभाज्यांपासून विद्यार्थ्यांनी आईस केक, मोमो, लाव्हा केक, मंचुरियन, पराठा, आईस्क्रीम, चीज बॉल, कबाब, मोजितो, सिझलर यांसारख्या रेसिपी बनविला होत्या. या सर्व पदार्थांचा परीक्षकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेस तसेच 100% प्लेसमेंट बद्दल माहिती दिली. Wild Vegetable Festival at Regal College
मा.डॉ.ओंकार निर्मळ यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख व औषधी गुणधर्म आणि त्यांचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यात त्यांनी कोकणात व महाराष्ट्रात मिळणाऱ्या रानभाज्यांची पीपीटी प्रेझेंटेशन नुसार सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर मा श्री शामकांत खातू यांनी विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राविषयी व्यावसायिक मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व उच्च शिक्षणाची संधी रिगल एज्युकेशन सोसायटीने निर्माण केल्या बद्दल रिगल कॉलेजचे कौतुक केले. Wild Vegetable Festival at Regal College
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.रोशनी शिरगावकर, द्वितीय क्रमांक कु. इशिता मोरे व तृतीय क्रमांक कु. श्रीशांत पवार आणि कु. सुविधा पवार यांनी पटकावला. रानभाज्या रेसिपीज स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगार तळीच्या 50 ते 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.सोनाली मिरगल यांनी केले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.संजय राव शिर्के संचालिका मा.डॉ. सुनिता शिर्के आणि रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. Wild Vegetable Festival at Regal College